Home आरोग्य जळगावकरांना दिलास : ‘त्या’ कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील सर्व २३ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

जळगावकरांना दिलास : ‘त्या’ कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील सर्व २३ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह


 

जळगावक (प्रतिनिधी) जळगावकरांना दिलासा देणारी बातमी आज समोर आली आहे. मेहरूणमधील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील २३ व प्रलंबित ४ असे एकूण सर्व २७ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

मेहरुनमधील कोरोनाबाधीत रुग्णांचे नातलग व संपर्कातील २३ जणांसह प्रलंबित असलेल्या ४ असे एकूण २७ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत ७१ जणांना उपचारार्थ दाखल केले असून त्यातील ४१ रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर २७ जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहे. दोन दिवसांपुर्वीच एक रूग्णाला कारोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली होती. सोमवारी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयाने दिलेल्या माहितीनुसार तीन रूग्णांना कोरोना कक्षात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत ७१ जणांची रिपोर्ट नागपूर येथे पाठविण्यात आले. त्यातील ४१ जणांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound