जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा परीसरातील मयुर कॉलनीतील एका घराच्या वरच्या मजल्यावर सुरू असलेल्या जुगारावर मंगळवारी रात्री पोलीस उपअधीक्षकांनी छापा टाकून उधळून लावला. या कारवाईत १२ जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन १२ मोबाईल, तीन दुचाकींसह एकुण २ लाख ७१ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
१२ जणांवर गुन्हा दाखल
या कारवाईत पोलिसांनी संतोष भगवान बारी (वय-२६) रा. मरीमाता मंदीर पिंप्राळा, रघुनाथ देवसिंग पाटील (वय-४५) रा. गुरूदत्त कॉलनी पिंप्राळा, समाधान पंढरीनाथ चौधरी (वय-३०) रा.पिंप्राळा, पंकज सुरेश पाटील (वय-३०) रा. शिवकॉलनी, सचिन रघुनाथ पाटील (वय-२६) रा. मयुर कॉलनी, नीलेश लोटन कोळी (वय-३०)रा. मयुर कॉलनी, धिरज विजय पाटील (वय-४५) रा. गुजराल पेट्रोलपंपजवळ , राजेंद्र भिका भोई (वय-३०) रा. मयुर कॉलनी, मंगेश लक्ष्मण पाटील (वय-२७) रा. मयुर कॉलनी, पंकज विरभान पाटील (वय-३०) रा.मयुर कॉलनी, कुणाल शाम रामसे (वय-२०) व अनिल सुरेश गव्हाळे (वय-४४) दोघे रा. मयूर कॉलनी यांना ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात पोकॉ किरण धमके यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयितांना बुधवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
पिंप्राळा परिसरातील मयुर कॉलनी येथे कुलभूषण पाटील यांच्या नवीन घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत जुगाराचा खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी किरण धमके, सुनील पाटील, राजेश चौधरी, रवींद्र मोतीराया, अशोक फुसे, सचिन साळुंके, विनयकुमार देसले व पंकज शिंदे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह पथकाने छापा टाकला.
मुद्देमाल हस्तगत
मध्यरात्री पोलीसांनी जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाईत जुगाराचे साहित्य, १२ मोबाईल, तीन दुचाकी साधने व रोख रक्कम असा एकुण २ लाख ७१ हजार ४७५ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.