जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जळके येथील दुध उत्पादक सहकारी सोसायटीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील जळके येथील दुध उत्पादक सहकारी सोसायटीची कार्यकारिणी रविवारी, १७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सोसायटीच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उर्वरित कार्यकारिणी याप्रमाणे आहे.
संचालकपदी प्रल्हाद मोतिराम पाटील, नेमिचंद ताराचंद जैन, काशिनाथ दशरथ पाटील, रमेश जगन्नाथ पाटील, धनराज वसंत पाटील, तुकाराम भगवान पाटील, गंगाधर आनंदा पाटील, अजित मोतिलाल पाटील, सुभाष ओंकार पाटील, शिवाजी काशिराम पाटील, भिमराव शामराव बोरसे,भिकन रामु चिमणकारे, ज्ञानेश्वर सिताराम पटवळे तसेच नवनियुक्त चेअरमन प्रशांत अशोक पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव प्रकाश तुळशिराम पाटील यांनी कामकाज पाहिले.