रावेर, प्रतिनिधी । महाराष्ट्रात कोरोना’चा पादुर्भाव वाढत असून त्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांनी जिल्हात जमावबंदी आहे. त्यामुळे जलदिन सप्ताह कोणतीही गर्दी न करता साजरा करण्याचे अवाहन आज उपविभागीय अभियंता शशिकांत चौधरी यांनी केले आहे.
जलसंपदाच्या पाटबंधारे विभाग येणाऱ्या दि १६ ते दि २२ मार्च’ला जागतीक जलदिन साजरा करणार आहे. या सप्ताहा दरम्यान जनतेला पाण्याचे महत्व पटवुन दिले जाईल तसेच कोरोना संदर्भात जिल्हात जमावबंदीचे आदेश असल्याने कोणतीही गर्दी न करता जिल्हाधिकारी यांच्या आदेश्याचे पालन करावे व घरो-घरी पाण्या संदर्भात महत्व पटवून देण्यात येणार असल्याचे पाट बंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता शशिकांत चौधरी यांनी दिली आहे.
मोर धरणावर दि. २२ ला जलपूजन
कोरोना वायरस पासुन खबरदारी म्हणून जागतीक जलदिन सप्ताह कोणते ही गर्दी न करता साजरा करावा पाण्याचे महत्व पाटबंधारे विभाग उपक्रमा द्वारे पटवून देण्याचे काम करणार आहे. तसेच येत्या दि. २२ मार्च’ला मोर धरणावर जलपूजन सुध्दा करण्यात येणार आहे.