टोकियो : वृत्तसंस्था | ऑलींपीकमधील शेवटच्या टप्प्यात बहुतेक संघ व खेळाडूंनी निराशा केली असतांना आज कुस्तीपटू बजरंग पुनिया याने कांस्य पदक पटकावले आहे.
बजरंग पुनिया हा काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हरला होता. यानंतर आज तिसर्या आणि चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत त्याने विजय संपादन करून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. कजागिस्थानच्या कुस्तीपटूला पराभूत करून त्याने हा पराक्रम केला. यामुळे भारतीय क्रिडा विश्वात जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे.