Home Cities अमळनेर जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

0
23


अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कुर्‍हे खुर्द येथील खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटलेल्या व्यक्तीचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली.

रवींद्र अजबसिंग पाटील (वय ४८, ह.मु.सुरत, मूळ रा. कुर्‍हे खुर्द ) याने १९ वर्षांपूर्वी कुर्हे गावातील एका डॉक्टर महिलेसह तिच्या आईचा खून केला होता. त्यानंतर नाशिक व पैठण कारागृहातून शिक्षा भोगली. दोन वर्षांपूर्वी तो शिक्षा भोगून नंतर निर्दोष सुटला होता. त्याची पत्नी, मुलगी हे सुरत येथे वास्तव्यास आहे. तो सुरत येथून आपल्या मूळ गावी कुर्‍हे येथे अलीकडेच आला होता. लॉकडाऊनच्या कालावधीत तो गावातील लोकांना धमकावत होता. यामुळे जमावाने त्याच्यावर सोमवारी दुपारी हल्ला चढवून मारहाण केली. यात सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.


Protected Content

Play sound