तिरुअनंतपुरम (वृत्तसंस्था) जबरदस्तीने दारू पाजून आपल्या मित्रांसोबत पत्नीवर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार तिरुअनंतपुरमच्या हद्दीत कादिनामकुलमजवळ घडली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, नवरा आणि त्याच्या मित्रांनी तिला जबरदस्तीने दारू पाजली आणि निर्जन ठिकाणी नेले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत गुरुवारी रात्री अटक केली आहे.