जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पशुधनाच्या संतुलित आरोग्यासाठी मान्सूनपूर्व लसीकरण सुरू असून प्रत्येक पशुपालकाने जबाबदारीने पशुधनाच्या आरोग्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. एम. पी. बाविस्कर यांनी केले आहे.
पशुधनाची प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी व कोणत्याही रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी हंगामाप्रमाणे नियमित लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. यानुसार जिल्ह्यातील ९० टक्के पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. जळगाव तालुक्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत मोफत लसीकरण दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लसीकरणासाठी योग्य तो प्रतिसाद देणे गरजेचे आहे. तसेच शेतात रासायनिक खतांचा, तणनाशकांचा वापर करण्यात येत असल्याने पशुपालकांनी जनावरांना अशा ठिकाणी चरण्यासाठी जाऊ देऊ नये. अशा ठिकाणी होणारी विषबाधा रोखण्यासाठी पशुपालकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन केले.डॉ. एम. पी. बाविस्कर यांनी केले आहे.