जनमत प्रतिष्ठातर्फे सरदार पटेल यांना अभिवादन

जळगाव, प्रतिनिधी | जनमत प्रतिष्ठानतर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

लोहपुरुष व माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज एम. जे. कॉलेज जवळील कोटा क्लास येथे जनमत प्रतिष्ठानतर्फे सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच लहान मुलांना दिवाळीचा फराळ वाटण्यात आला. याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, राजेंद्र वर्मा, एस. के. सिंग, प्रतिभा मेटकर,पियूष परदेसी, शांतनू सपकाळे, ओम परदेसी, आर्यन सोनवणे, हर्षाली पाटील, राहुल कोळी आदी उपस्थित होते.

Protected Content