जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जगवानी नगरातील ६० वर्षीय व्यक्तीचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बबन नामदेव पवार (वय-६३) रा. जूनी वसाहत, जगवानी नगर, जळगाव असे मृत वृध्दाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बबन पवार हे आपल्या पोलीस कर्मचारी असलेल्या मुलगा व सुन यांच्यासोबत जगवानी नगरात वास्तव्याला होते. बबन पवार हे बुधवारी १ मार्च रोजी सायंकाळी बाहेर गेले होते. गुरूवारी २ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मेहरूण तलाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या काही वन्यजीव पथकातील काही सदस्यांना वृध्दाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. सुरूवातील अनोळखी म्हणून पथकातील राजेश सोनवणे, रविंद्र भोई, अजीब काझी यांनी पोहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी समाधान टहाकळे आणि विकास सातदिवे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. पाण्यात कोणत्या कारणाने बुडाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. त्याच्या खिश्यातील कागदपत्राच्या आधारे त्यांची ओळखी पटली. बबन नामदेव पवार असे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या मुलगा विकास पवार यांनी ओळख पटविली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी समाधान टाहकळे करीत आहे.