यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील संजय वसंत पारधे( वय ५५) हे, गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास यावल फैजपुरमार्गावरील अंजली हॉटेलच्या पाठीमागील भागात चिखलात जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले आहे. यावरून येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे.
यावल येथील सिद्धार्थ नगरातील रहिवासी संजय वसंत पारधे (वय ५५) हे गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास, जखमी अवस्थेत पडलेले असल्याचे समजण्यावरून सिद्धार्थ नगरातील शेजाऱ्यांनी त्यांना तात्काळ यावल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले असता रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी पारधे त्यांना मृत घोषित केले आहे. जखमी अवस्थेत त्यांच्या कपाळाला गंभीर जखम असल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. याबाबतची खबर मयताचा मुलगा गौतम संजय पारधे यांनी दिल्यावरून येथील ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुदाम काकडे, पोलीस नाईक राजेन्द्र पवार हे करीत आहेत.