छोटा राजनला दोन वर्षांची शिक्षा

 

मुंबई – वृत्तसंस्था । खंडणीच्या गुन्ह्यात मुंबई सत्र न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजन आणि अन्य तिघांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यामुळे छोटा राजनच्या शिक्षेत वाढ झाली आहे.

नंदू वाजेकर नावाच्या बिल्डरने २०१५ मध्ये महाराष्ट्रातील पुण्यात जमीन खरेदी केली होती. विक्रीच्या भाग म्हणून परमानंद ठक्कर नावाच्या एजंटला २ कोटी रुपयांचे कमिशन देण्यात आले. ठक्कर यांनी मात्र कमिशन म्हणून अधिक पैशांची मागणी केल, जे वाजेकर यांनी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर ठक्कर यांनी छोटा राजन याच्याकडे संपर्क साधला असा आरोप आहे.

त्यानंतर छोटा राजनने त्याच्या काही साथीदारांना वाजेकरांच्या कार्यालयात पाठवून धमकावण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर दोन कोटी ऐवजी वाजेकरांकडून २६ कोटीच्या खंडणीची मागणी करण्यात आली. खंडणी न दिल्यास वाजेकरांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या वाजेकरांनी पनवेल पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी छोटा राजनविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.

या खटल्यात एकूण चार आरोपी असून सुरेश शिंदे आणि लक्ष्मण निकम ऊर्फ दादया, सुमित आणि विजय म्हात्रे अशी त्यांची नाव आहेत. पोलिसांना ठक्करचा अद्यापही शोध लागलेला नाही. बिल्डरकडे सीसीटीव्ही फुटेज असून त्यातून आरोपींनी वाजेकरांच्या कार्यालयात जाऊन त्यांना धमकावल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. शिवाय कॉल रेकॉर्डिंगमधूनही छोटा राजन त्यांना धमकावत असल्याचं दिसून येत आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावर आज फैसला आला असून छोटा राजनसह तिघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Protected Content