जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा संभाजी बिग्रेड च्या वतीने रक्तदान व नेत्रदानाचा संकल्प करून वंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजुमामा भोळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, संभाजी ’बिग्रेड उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष शाम पाटील, मराठा सेवासंघ विभागीय उपाध्यक्ष राम पवार, दिनेश कदम (राष्ट्रीय सचिव वसतिगृह कक्ष ), नगरसेवक मयुर कापसे,नगरसेवक गजानन देशमुख, नगरसेवक अमर जैन, नरेंद्र पाटील ( संस्थापक, शोभाराम प्रतिष्ठान ) यांच्या उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला संभाजी महाराज व शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजन व माल्यअर्पण करण्यात आले. त्यानंत्तर सर्व प्रमुख मान्यवरानी मार्गदर्शन केले. तसेच शामदादा पाटील यांनी नेत्रदान व रक्तदान विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी साधारण ५१ लोकांनी संकल्प केला तसेच ३५ लोकांनी रक्तदान केले. नवनीयुक्त पदाधिकार्यांची नियुक्ती मान्यवरांच्या उपस्थिती करण्यात आली. विधिसल्लगार पदी दिनेश डी. पाटील तसेच जळगाव तालुकाध्यक्षपदी प्रफुल्ल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगराध्यक्ष संदीप पाटील, जिल्हाउपाध्यक्ष मयुर चौधरी कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील,संदीप माडोळे , जिल्हासंघटक गणेश पाटील, जळगांव शहर सचिव शंतनू जगताप, राहुल पाटील, सतीश लाठी , राकेश कोठारी, प्रमोद कुंभार, निलेश चौधरी, कौस्तुभ पाटील, राहुल शिंदे, शक्ती महाजन, पियुष भावसार, आकाश धनुरे, कुलदीप निरखे, राहुल जाधव, मयूर तायडे, भरत पाटील, राजेंद्र पाटील ,प्रफुल्ल पाटील, गोपाल पाटील,शरद कापुरे,महेंद्र पाटील, मनोज गुंजाळ,हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड जळगाव यांच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण पाटील,. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी तर आभार प्रदर्शन तुषार सावंत यांनी केले.