छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंवर ‘लीलावती’त उपचार

Shivndraraje

सातारा (वृत्तसंस्था) सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवेंद्रराजे त्यांच्या ‘सुरुची’ बंगल्यावर होते. रात्री उशिरा अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने साताऱ्यातील ‘प्रतिभा’ रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आमदार शिवेंद्रराजे यांना सुरूवातीला साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती ठीक असून त्यांना चांगले वाटल्यास घरी सोडणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आल्याचे कळते. मुंबईतील लीलावती रुग्णालयात शिवेंद्रराजेंवर उपचार होणार आहेत.

Protected Content