Home Cities जळगाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील नवीन तथ्यांची माहिती करून घेवू – राज्यपाल भगतसिंह...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील नवीन तथ्यांची माहिती करून घेवू – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0
35

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे स्त्रोत आहेत. त्यांच्या इतिहासातील काही नवीन तथ्य लोकांनी मला सांगितले आहेत. या तथ्यांनुसार मी माहिती घेतो, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.

राज्यपाल कोश्यारी यांना दोन दिवसांचा जळगाव दौरा होता. आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जलतरण तलावचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहे. राज्यपाल यांनी केलेले वक्तव्य मागे घ्यावे आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राज्यातून केली जात आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतसेच लोकसंघर्ष मोर्चा कडुन काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला. मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

 


Protected Content

Play sound