जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार आज पुण्यतिथी. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेतर्फे महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांनी त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.
आज शनिवार, दि.१६ रोजी सकाळी शिवतीर्थ (जी.एस.ग्राऊंड) येथे महापालिकेतर्फे महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील,चंद्रकांत वांद्रे, नितीन पटवे, श्री.कोल्हे यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासही माल्यार्पण करून अभिवादन केले.
.