छत्रपती शाहू महाराज मार्केटमधील चार दुकाने सील (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी ।  शहरातील छत्रपती शाहू महाराज व्यापारी संकुलातील दुपारच्या ४.३० वाजेपर्यंत थकबाकीदार ४  गाळे सील करण्याची कारवाई महानगर पालिकेच्या पथकाद्वारे करण्यात येत आली असून गाळे सीलची कारवाई करण्यात आली. 

 

महापालिकेचे उपायुक्त प्रशांत पाटील, उपायुक्त संतोष वाहुळे व पथकाने आज दुपारी ३ वाजेपासून छत्रपती शाहू महाराज व्यापारी संकुलातील ज्या थकबाकीदार गाळेधारकांनी आजपर्यंत थकबाकीपोटी काहीच रक्कम भरलेली नाही अशा गाळ्यांना सील कारवाई करण्यात आली. यात दुकान नंबर ४१, ४४ व २  व एक अन्य  अशी चार  दुकाने सील करण्यात आली.  ज्या गाळेधारकांनी अद्यापही काहीच रक्कम भरलेली नाही व  ज्यांनी मागील दहावार्षापासून केवळ १० हजार, १५ हजार रुपये भरले आहेत अशा गाळेधारकांना प्रत्यक्ष भेटून उपायुक्त प्रशांत पाटील व संतोष वाहुळे यांनी त्यांचे थकबाकी भरण्याबाबत समुपदेशन केले.  त्यांना प्रतिसाद देत  गाळेधारकांनी २५ लाखांचे धनादेश महापालिकेला दिले असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना दिली. ही कारवाई  किरकोळ वसुली विभाग व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत एकूण ६० लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.  

 

भाग १
https://www.facebook.com/508992935887325/videos/375295084198063

भाग २
https://www.facebook.com/508992935887325/videos/233742652007738

Protected Content