
रायपूर (वृत्तसंस्था) छत्तीसगडमधील बस्तर येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखील दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा बटालियनचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर एक नक्षलवादीही ठार मारला गेला आहे. दरम्यान, या चकमकीत इतर ४ जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.
बस्तर विभागातील बीजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या इरापल्ली गावात सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नक्षलवादी आणि कोब्रा बटालियनच्या जवानांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीनंतर सीआरपीएफ एक नक्षलवादी ठार झाला, तर चकमकीनंतर शस्त्रही हस्तगत करण्यात आले. या चकमकीदरम्यान शहीद झालेले दोन जवान कमांडो बाटालियन फॉर रिसॉल्युशन अॅक्शन (कोब्राची २०४ बटालियन) या सीआरपीएफच्या विशेष पथकाचे होते. चकमक झालेल्या या भागात सीआरपीएफचे नक्षलवाद्यांविरोधातील आंदोलन अजूनही सुरूच असल्याचे वृत्त आहे