चौपदरीकरण कामाची गुणवत्ता त्रयस्थ अशासकीय संस्थेद्वारा तपासणी करा

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची गुणवत्ता/दर्जा त्रयस्थ अशासकीय संस्थेद्वारा तपासणी करण्यात यावी अशी मागणी जळगाव फर्स्टतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ चे चौपदरीकरण व समांतर रस्ते विकसित करण्याचे काम झांडू कंपनीद्वारे सुरु आहे. हजारो अपघात, शेकडो जळगावकरांचे बळी गेल्याने अनेक वर्षांच्या आंदोलनानंतर हे काम केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयांतर्गत नही (NHAI) च्या देखरेखीखाली सुरु आहे.या कामाचे अवलोकन केले असता कामाच्या सध्यस्थितीबद्दल अनेक तृटी ,तक्रारी,उणीवा नजरेसमोर येतात. कामाच्या ठिकाणी जे वळण रस्ते आहेत तेथे डांबरीकरण नाही ,धूळ उड़ते ,मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत,पाणी मारले जात नाहीत,रीफ्लेक्टर नाहीत. रस्त्यावर जो भराव होतो आहे ,तेथे मुरूम, खडी ऐवजी मातीचा वापर केलेला दिसतो. तसेच रस्त्यांचे , भुयारी मार्गाचे जे कोन्क्रीट आहे त्याची गुणवत्ता दर्जा हे देखील निविदेत नमूद केलेल्या दर्जाचे, त्या मानकाप्रमाणे नाही. ५ लाख जळगावकरांच्या सुरक्षिततेच्या जिव्हाळ्याच्या या कामात प्रचंड अनियमितता ,उणीवा दिसून येतात. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची गुणवत्ता दर्जा त्रयस्थ अशासकिय संस्थेद्वारा तपासावा तसेच संपूर्ण काम हे निविदेत नमूद केल्याप्रमाणे होत आहे की नाही याबद्दल चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी जळगावकरांच्या वतीने जळगाव फर्स्ट दवारे करत करण्यात आली. कारण भविष्यात जर हा रस्ता खराब झाला तर त्याच्या देखभाल दुरूस्तीविषयी मोठ्या समस्या उद्भवू शकतील अशी शंका उपस्थित करून जिल्हाधिकारी स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनांवर जळगाव फर्स्टचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी, दिलीप तिवारी, डॉ. जुगल किशोर दुबे, गजानन मालपुरे आदींची स्वाक्षरी आहे.

Protected Content