भुसावळ, प्रतिनिधी । नॅशनल हायवेवर चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने डांबरी रस्त्यांना मधोमध पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी कच्चा रस्ता तयार केल्याने मोटरसायकल स्लिप झाल्याने १५ अपघात झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नॅशनल हायवे क्रमांक सहाचे चौपदरी करणाचे काम सुरू आहे. तसेच सुहास हॉटेल समोर डांबरी रस्त्याच्या मधोमध पूल बांधण्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी पर्यायी मुरूम टाकून कच्चा रस्ता बनविण्यात आला आहे. तसेच चौपदरीकरणांच्या कामासाठी रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून मोठा खड्डा तयार करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी कुठलेही फलक आडोशाला लावलेले नसल्यामुळे मोटरसायकल १५ चालकांचा सकाळपासून ते संध्याकाळ पर्यत मुरूमावरून मोटरसायकल स्लिप झाल्याने चालकांचे व त्यांच्या लहान मुलांचे हात-पाय फ़ॅक्चर झाले आहेत तसेच डोक्याला मार लागला आहे. एवढेच नव्हे तर काही महिला किरकोळ जखमी झाल्या आहे. सकाळी १०.०० वाजेच्या दरम्यान प्रथम घटना स्कुटीवर एक मुलगी नाहटा कॉलेजमध्ये जात असतांना पडली. सुदैवाने मोठे अवजड वाहन न आल्याने जीवितहानी टळली. यानंतर अपघाताची मालिकाच सुरू झाली होती. यावेळी माळी भवन कॉम्प्लेक्स मधील व्यापाऱ्यांनी मोटरसायकल अपघातांना मदत केली. तसेच हायवे इंचार्ज जय नगरे यांना अपघात होत असल्याची माहिती दिली असता माझी ड्युटी संपली आहे. रात्रपाळी वाले बघतील त्या ठिकाणी मुरूम टाकण्याचे ते ठरवतील असे सांगून स्वतःचा बचाव केला. व्यापाऱ्यांनी सुहास हॉटेल समोर पडलेला लोखंडी बोर्ड आणला. खोदकाम केलेल्या रस्त्याच्याकडेला लावला. त्यानंतर एकही अपघात झाला नाही. यासाठी शिवसेना माथाडी कामगार संघटनेचे उपसचिव गजानन माळी व माळी भवन कॉप्लेक्सचे व्यापाऱ्यांनी अपघातग्रस्तांना सहकार्य केले. अशा या निगरगठ्ठा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.