जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणारा संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली असून त्याच्या ताब्यातून सात चोरीच्या दुचाक्या हस्तगत केले आहे.
सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरासह एमआयडीसी, भुसावळ आणि कासोदा ता. एरंडोल या भागातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. या अनुषंगाने पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मागदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ महेश महाजन, पो.ना. किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, अविनाश देवरे, रणजीत जाधव, विनोद पाटील, उमेशगिरी गोसावी, हरीष परदेशी आणि विजय चौधरी यांचे पथक दुचाकी चोरीचा गुन्ह्याचा शोधासाठी रवाना केले. यात संशयित आरोपी मुकुंदा डिंगबर सुरवाडे (वय-३६) रा. विवेकानंद नगर भुसावळ याला अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ९३ हजार रूपये किंमतीच्या चोरीच्या सात दुचाक्या हस्तगत केल्या आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.