पाचोरा प्रतिनिधी । जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणावर होत आहे. यापार्श्वभूमीवर तालुक्यातील पिंपळगाव पोलीसठाण्याच्या पथकाने दुचाकीची चोरी करणारे दोन संशयित आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. दोघांकडून चोरीच्या १० मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहे.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायटे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार दाखल गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि निता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ३० जानेवारी रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी गणेश बाबुलाल परदेशी (वय-४२) आणि अंकुश भिमराव मरसाडे (वय-२३) दोन्ही रा. जंगिपूरा ता. जामनेर दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. दोघांना खाक्या दाखविताच त्यांनी दहा चोरीच्या दुचाकींची चोरी केल्याचे कबुल केले.
यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशान्वये प्रभारी अधिकारी सपोनि निता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ निवृत्ती मोरे, रणजीत पाटील, पो.ना. अरूण राजपूत, रविंद्रसिंग पाटील, संदीप राजपूत, चालक पो.ना. सचिन वाघ यांनी कारवाई केली.