जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोरी केलेल्या बकर्यांची विक्री करणार्यासाठी एमआयडीसीतील गुरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या दोन महिलांना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी ४ मार्च रोजी अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या ६ बकर्या हस्तगत करण्यात आल्या असून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी बोराखेडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेे आहे.
शहरातील एमआयडीसी परिसरात भरणार्या गुरांच्या बाजारात चोरी केलेल्या बकर्यांची विक्री करण्यासाठी दोन महिला आल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोहेकॉ अल्ताफ पठाण यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना दिली. पोकॉ विशाल कोळी यांच्यासह दोन महिला पोलीसांना सोबत घेवून पठाण हे गुरांच्या बाजारात गेले असता, त्यांना याठिकाणी दोन महिला ६ बकर्या घेवून उभ्या दिसल्या. त्यांनी बकर्यांबाबत त्यांच्याकडे विचापूस केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने संशयित उषा पांडुरंग काटे (वय-५०) व सपना रविंद्र गोंधळी (वय-३२, दोघ रा. शिरसोली ता. जळगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी या बकर्या बुलढाणा जिल्ह्यातील मोताडा तालुक्यातील बोराखेडी येथून चोरी केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ अल्ताफ पठाण, दत्तात्रय बडगुजर, विशाल कोळी, राहुल रगडे, सचिन पाटील, मपोकॉ राजरी बाविस्कर, मंगला तायडे, आशा सोनवणे, महिला होमगार्ड ललिता फिरके यांच्या पथकाने केली.