चोपडा, प्रतिनिधी । जैन केसरसुरी संप्रदायाचे आचार्य प.पु. राजरत्न सुरीश्वरजीचे महाराज व त्यांचे शिष्य प.पु. श्री.धर्मरत्न विजयजी महाराज यांचे चोपड्यात दि.२७ जानेवारीला भव्य प्रवेश होणार असून त्यांच्या सानिध्यात श्रीयंत्र महापुजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर असे की, आचार्य श्रीचे बुधवार दि.२७ रोजी सकाळी ८ वाजता अडावद मार्गाने चोपडा शहरात भव्य प्रवेश होणार असून त्यांच्या मुखारविंदने गुरुवार दि.२८ जाने रोजी गुरुपुष्य नक्षत्र व पोष पौर्णिमाच्या पावन दिवशी सकाळी ९ वाजता श्रीयंत्र महापूजनचे आयोजन येथील श्री मुनीसुव्रतस्वामीं जैन श्वेतांबर मंदिर येथे होणार असून सदर पूजेचे लाभ अनिलकुमार सुनीलकुमार बुरड परिवार यांनी घेतले आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता जैन दादावाडी मध्ये श्री शांतिगुरुदेव पूजनाचे आयोजन करण्यात आले असून या पूजेचे लाभार्थी सौ.काजल जयेश मालू (रा.वरोरा) यांनी घेतले आहे. या प्रसंगी आचार्य श्रीच्या सुशिष्या प.पु.दिव्यरत्नाश्रीजी महाराज आदी ठाणा ३ येणार आहेत. केसरसुरी संप्रदायाचे चतुर्विध संघाचा भव्य प्रवेश होणार आहे तरी वरील सर्व कार्यक्रमाप्रसंगी समाजबांधवानी उपस्थिती देऊन लाभ घ्यावा. असे आवाहन जैन मंदिर ट्रस्टी व जैन दादावाडी ट्रस्टी यांनी केले आहे.