चोपडा प्रतिनिधी । शहरातील प्रताप विद्या मंदीर शाळेतील १९७२-७३ वर्षाच्या शैक्षणिक वर्षाच्या म्हणजे तब्बल ४८ वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा घेण्यात आला. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
बालपणाचा सखा हा कितीही मोठा झाला तरी तो सखाच राहतो. उभ्या आयुष्यात अनेक लोक भेटत असतात, परंतु लहानपणाचा मित्राची ओढ वेगळीच असते. असा आगळा वेगळा स्नेहमेळावा नुकताच चोपडा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आनंदराज पॅलेसच्या ए.सी.हॉलला पाहायला मिळाला.
तब्बल ४८ वर्षानंतर म्हणजेच १९७२-७३ मध्ये येथील प्रताप विद्या मंदिर मधील इयत्ता ११ वीचे विध्यार्थी स्नेह मेळावाच्या निमित्ताने एकत्र आले यातील अनेक जण तर ४८ वर्षा नंतरच एकमेकांना भेटल्याने कोणी हस्तोदोलन केले तर कोणी गळाभेट घेतली काहींना तर एकमेकांना भेटत असतांना आनंदाश्रू देखील थांबवता आले नाही. सन ७२-७३ची मित्रांची टिम एकत्र करणे सोपे नव्हते. तरीही उषा संचेती (पुणे) सह सुंदरलाल सचदेव, भोजराज पाटील, शैला गुजराथी यांनी कसोशीने प्रयत्न करून हा स्नेहमेळावा घडवून आणला. स्नेह मेळाव्यात सर्व प्रथम कोरानामुळे तापमान चेक करूनच हॉलला प्रवेश केला. प्रत्येकाला काढाही देण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात करतांनाच आपले काही स्नेही दिवंगत झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तद्नंतर प्रत्येकाने आप आपला परिचय दिला, परिचयात मागील ४८ वर्षात आपल्या परिवारावर आलेल्या सूखद- दुःखद घटनाचा अनुभव कथन केले. यामुळे सर्व मित्र-मैत्रिणींना आपला स्नेही, सखा कोणत्या परिस्थितीत आहे हे कळून गेले. या दोन दिवसांत चंदू नेवे, ओमप्रकाश शर्मा, डॉ.रविंद्र जैन गोविंद लाड आदींचे सत्कार करण्यात आले. प्रमोद चायल यांच्याकडून सर्व उपस्थितांना चांदीचा शिक्के वाटप करण्यात आले. लक्षवेधक उपक्रम म्हणजे प्रत्येक मित्राचा स्वतंत्र कव्हर पेजवर फोटो आणि मधल्या पेजवर स्वतः चा परिचय अशी एक डायरी देण्यात आली. नास्ता, जेवणासह गेम खेळण्यात आले.
संध्याकाळी संदीप सोनार, सचित भारती यांचे स्वर संध्याचा कार्यक्रम ठेवण्यात आले यात सर्व जुने गाणे गायन करण्यात आले ह्या गाण्यांवर अनेकांनी ताल धरला ६५ वर्षांचे आपले निवृत्तपण सोडून बालपणाच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी परिवारासोबत ताल धरला. आणि मनसोक्त नाचले या दोन दिवसांत एक दिवसाचे जेवण सुरेश बडगुजर यांच्या फॉर्म हाऊसला केल्याने वन भोजनाचा देखील आनंद घेण्यात आला. हा सुंदर कार्यक्रमाचे फोटोग्राफी नंदकिशोर पाटील यांनी केले तसेच सर्व मित्रांनी आप आपल्या जवळील जुने फोटो देखील आणले होते ते देखील पाहण्यात आले यावेळी अनेकांना जुन्या स्मृति पटलावर आल्या.केक कापून उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी आनंदराज पॅलेसचा हॉलचे व रूम ज्यांनी मोफत उपलब्ध करून दिले ते डॉ. निर्मलकुमार टाटीया, मनिष, चेतन टाटीया यांचे देखील सत्कार करण्यात आले. या स्नेह मेळावासाठी जळगाव, पुणे, अमळनेर, नाशिक, मबुई, राजस्थान, गुजरात अश्या विविध ठिकाणहुन मित्र मंडळी आली होती. यावेळी सुरेश पोतदार, सुरेश टाटीया, विनोद पालिवाल, वीणा गुजराथी, मनोहर कुलकर्णी, अजीत गुजराथी, महेश जैन, प्रताप पाटिल, वासुदेव करोडपती, शांतीलाल जैन, मैना मालू, प्रतिभा पाटील, अनिल तोतला, प्रदिप जोशी, प्रेमलता टाटीया, राजूभाई पाटील, अरुण अग्रवाल, अरुण महाजन, हेमंत अग्रवाल, हरीष लोहार, अशोक मेमाने, तुलसीराम पाटील, विष्णु पोतदार, जगन्ननाथ पाटील आदिंनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.