Home क्राईम चोपडा येथे डेअरी दुकान फोडले; शहर पोलिसात गुन्हा

चोपडा येथे डेअरी दुकान फोडले; शहर पोलिसात गुन्हा


चोपडा प्रतिनिधी । शहरातील शॉपींग सेंटरमधील डेअरीचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील १ लाख ८२ हजार रूपये किंमतीची रोकड व टीव्ही चोरून नेल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रल्हाद बळीराम पाटील (वय-५०) रा.गणेश कॉलनी हे दुधाचा व्यवसाय करतात. पंचायत समितीसमोरील शॉपींग कॉम्प्लेक्समध्ये निर्मल मिक्ल प्रॉडक्ट नावाचे दुकान आहे. २५ जून रोजी रात्री एक ते अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने डेअरीमधील एक्सॉस फॅन काढून दुकानात प्रवेश करत दुकानातील १ लाख ७५ हजर रूपयांची रोकड व टीव्ही असा एकुण १ लाख ८२ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. सकाळी ७ वाजता दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकान फोडल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे मनोज पवार यांनी भेट देवून पाहणी केली. प्रल्हाद पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुरंन ८१/२०२०, भादवी ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नारायण पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound