चोपडा प्रतिनिधी । येथील विवेकानंद विद्यालयाचे कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी आज जागतिक वसुंधरा दिवस निमित्त ऑनलाईनच्या माध्यमातून महत्व पटवून देत जनजागृती केली आहे.
विवेकांनद विद्यालयाचे कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून लॉकडाऊन परीस्थितीत घरी बसूनच ऑनलाईन, हात बाहुलीच्या सहाय्याने “हा नाश थांबवा भूमातेचे तन- मन जळते आहे, हि वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे” हे पृथ्वीचे शोकगीत सादर करीत जनजागृती केली. गेले काही महिन्यापासून विसपुते अशा विविध माध्यमातून समाजाला ज्ञान देण्याचे कार्य करीत आहे.