चोपडा प्रतिनिधी । येथील विवेकानंद विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शालेय परिपाठाने करण्यात आली.
राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचे पूजन मेधा गोखले, कल्याण, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका वासंती नागोरे, राधेशाम पाटील, अनिल शिंपी यांच्याहस्ते करण्यात आले. इयत्ता चौथीचे विद्यार्थी चेतन लांडगे याने महाराजांच्या जीवनावर आधारित स्वतःच्या शैलीत माहिती सांगितली. नक्षत्र कापुरे, निल केंगे, हर्षित विसावे, निहार पाटील, ऋषिकेश भालोदकर, मयूर सावकारे यांनी पोवाडे सादर केले. उपशिक्षक राधेश्याम पाटील यांनी विद्यार्थ्यांना साध्या-सोप्या भाषेत राजा शिवछत्रपती यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत ते असे म्हटले सत्य आणि इतिहास कधी बदलत नाही. सत्य हे सत्य असते. राजा शिवछत्रपती सारखा राजा आपल्या भूमीत जन्माला यावा म्हणून अनेक दिग्गज व्यक्तींनी महाराजांच्या जन्मभूमी, कर्मभूमीची माती आपआपल्या राज्यात नेऊ केली.
महाराजांचे कार्य इतके मोठे आहे की, जो जसा अभ्यास करेल तसे त्याला महाराज कळतील.महाराजांचा आदर्श घेण्याची आजच्या काळाला गरज आहे. असे ते याप्रसंगी म्हटले ठाणे येथील रोहिणी रणदिवे या प्रसंगी म्हटल्या की इतिहास हा आपल्या जीवनात आचरणात आणला पाहिजे. जीवनात चांगले योग्य मित्र-मैत्रीण हवे. अभ्यासाची स्पर्धा करा.महिलांचा योग्य आदर व्हायला हवा. विद्यार्थ्यांनी अनेक पुस्तके वाचावीत. उपक्रम करावे, कला जोपासा, चांगल्या गोष्टींचे कौतुक करायला मागे सरकू नका. तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वासंती नागोरे यांच्यासह त्यांच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर येथील मैत्रिणींच्या समूहाने विद्यालयास याप्रसंगी 50 ते 60 पुस्तकांचा संच भेट देऊ केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपशिक्षक जावेद तडवी, फलक लेखन व छायाचित्रण कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केले. कार्यक्रमास सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.