Home Cities चोपडा चोपडा येथील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवरायांना अभिवादन

चोपडा येथील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवरायांना अभिवादन


chopda1

चोपडा प्रतिनिधी । येथील यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने या कार्यक्रमात यशोधन चैरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ राहुल पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ राहुल पाटील यांनी महाराजांची प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षिका परमेश्वरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील विनीत पाटील व मा जिजाऊंच्या वेशभूषेतील ईश्वरी नाथबुवा या दोघांचेही पूजन केले. नर्सरी ते तिसरीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आशीर्वाद घेतले. शाळेच्या प्राचार्या यांनी महाराजांचे आदर्श जीवन कसे होते यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या साहाय्याने महाराजांच्या जीवनावर आधारीत चित्रपट दाखविण्यात आला तसेच शाळेतील शिक्षिका श्रद्धा देशमुख यांनी विद्यार्थ्यांना महाराज्यांच्या बालपणीच्या गोष्टी सांगून विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह भरला. जय भवानी ! जय शिवाजी ! या जय घोषणांनी सर्व शाळेचा परिसर दणाणून गेला. सूत्रसंचालन लिपिका नागदेव यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound