चोपडा महाविद्यालयात उद्यापासून तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

 

चोपडा, प्रतिनिधी | येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२९ ते ३१ जानेवारी दरम्यान श्रमसंस्कार व्यक्तिमत्त्व व नेतृत्व गुण विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सदर कार्यशाळेचे उदघाटन डॉ. अविनाश बडगुजर (जळगांव) यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधावा, नेतृत्वगुण कसे अंगिकरावेत या सारख्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या असंख्य पैलूंवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. विद्यापीठांतर्गत परिसरातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ.डी.ए.सुर्यवंशी व विद्यार्थी विकास अधिकारी विशाल हौसे यांनी केले आहे.

Protected Content