चोपडा प्रतिनिधी । चोपडा येथील बी फार्मसी महाविद्यालयात १५ जून पासून ई-लर्नींगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे नवीन वर्ष सुरू होत असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आलेली आहे.
१९९२ मध्ये कै. शिक्षण महर्षी दादासाहेब सुरेशजी पाटील यांनी दूरदृष्टी ठेवून ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांकरीता फार्मसी महाविद्यालय सुरू केले आहे. संस्थाध्यक्ष संदीप सुरेश पाटील व सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने चोपडा येथील बी फार्मसी महाविद्यालय हे एनबीए चे मानांकित महाविद्यालय आहे. दरवर्षी महाविद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. दरम्यान, लॉकडाऊनमुळे यंदा महाराष्ट्र शासनाने व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता त्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने चोपडा येथील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गौतम प्रकाश वडनेरे यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन १५ जून २०२० पासून द्वितीय तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांन करिता ऑनलाइन ई-लर्नींगच्या माध्यमातून रेगुलर वर्ग घेण्याची नियोजित केलेले आहे. संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील व संस्थेचे सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांनी वरील निर्णयाचे स्वागत केले असून, मार्गदर्शनपर शासन नियमांची काटेकोरपणे अंबलबजावणी करण्याचे सूचना देखील प्राचार्यांना देण्यात आलेले आहेत.
नुकत्याच मागील महिन्यात महाविद्यालयाच्या वतीने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील ही वेबिनार देखील आयोजन करण्यात आले होते. ई- लर्निंग या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गौतम प्रकाश वडनेरे, महाविद्यालयाचे शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. जे. सी हुंडीवाले, तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मेहनत घेत आहे.