चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील प्रत्येक घरोघरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषधांचे वाटप करण्याची मागणीचे निवेदन श्री संता सावता माळी युवक संघाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर निवेदनात कोव्हिड-१९ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर कुठल्याही प्रकारची लस तयार नसल्यामुळे आणि तसेच संपूर्ण राज्यात लॉकडाऊन मध्ये झालेली स्थितीलता यामुळे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. लॉकडाऊन ५ मध्ये रेड झोन वगळता जवळजवळ सर्वच प्रकारची सूट असल्यामुळे आणि त्या मुळे होणारे दैनंदिन व्यवहार या साठी आता सर्वच जण घरामधून बाहेर पडू लागले आहेत. आता कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता जिल्हा बॉर्डरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही कसल्याही प्रकारची परमिशन न घेता ये-जा करू शकतात. गेल्या दोन दिवसांपासून वेळोवेळी लॉकडाऊनमध्ये होणारे बदल, सूट यामुळे कोरोना रुग्णांमध्ये भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रत्येक घरोघरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषधांचे वाटप करण्याची मागणीचे निवेदन श्री संता सावता माळी युवक संघाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
श्री संत सावता माळी युवक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण माळी, जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र माळी, शहराध्यक्ष दशरथ तायडे, शहर उपाध्यक्ष रोहित माळी, शहर सचिव विठ्ठल माळी, तालुकाध्यक्ष राजेंद्र माळी, तालुका उपाध्यक्ष अलकेश माळी, कार्याध्यक्ष महेंद्र माळी, सहसंघटक राकेश माळी, प्रसिद्धी प्रमुख गौरव माळी, राहूल माळी, प्रदीप माळी, समाधान माळी, तालुका संपर्कप्रमुख समाधान माळी यांनी तहसिलदार यांना निवेदन दिले.