Home Cities चोपडा चोपडा काँग्रेसतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन

चोपडा काँग्रेसतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन

0
28

चोपडा प्रतिनिधी । चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे प्रजासत्ताक दिन जन शिक्षण संस्था चोपडा येथे संपन्न करण्यात आला यावेळी ध्वजारोहण करून ध्वजवंदन करण्यात आले.

यानिमीत्त आज सकाळी ध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी राष्ट्रगीत झाल्यानंतर घोषणा देण्यात आल्या. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो ,जय जवान जय किसान, भारत माता की जय, शेतकर्‍यांच्या न्याय मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, भारत माता की जय, महात्मा गांधी की जय ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, शहराध्यक्ष के. डी. चौधरी, अशोक साळुंखे, रमाकांत सोनवणे, चेतन बाविस्कर, पटेल इलियास, शिरीष बडगुजर, देवकांत चौधरी, कांतीलाल सनेर आदी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मानवंदना दिली.


Protected Content

Play sound