चोपडा, प्रतिनिधी । कोविड १९ च्या संसर्ग काळात गेल्या चार महिन्यांपासून प्रवाश्यांच्या दृष्टीने थांबलेली लालपरी आज दि.२ अॅागस्ट पासून पुन्हा सुरु करत ‘पुनश्च हरिओम’ केला जात आहे.
चोपडा आगाराने रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत काही प्रवाशी सेवा नियते सुरू करण्यात येत आहेत. या सेवामध्ये सकाळी साडे आठ वाजता चोपडा-रावेर,सकाळी नऊ व बारा वाजता चोपडा अमळनेर, सकाळी आठ वाजता चोपडा एरंडोल, तसेच सकाळी अकरा वाजता चोपडा यावल या फे-या सुरु करण्यात आल्या आहेत. प्रवाश्यांना उपयोगी बस सेवा बंद असल्याने प्रवाश्यांना आपल्या गरजेसाठी खाजगी वाहनांकडे नाईलाजाने वळावे लागत होते.परंतु या बससेवेमुळे हक्काची लालपरी पुन्हा सेवेत आली आहे. याप्रवाशी सेवेला जनतेने सहकार्य करावे असे आवाहन आगार प्रमुख क्षिरसागर यांनी केले आहे.सरकारी नियमांचे पालन करुन बससेवेला मिळणारा प्रतिसाद पाहून सेवेत वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.