जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील तांबापूरा परिसरातील खदानीजवळ चॉपर घेवून दहशत माजविणाऱ्यांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली होती. याठिकाणाहून मोहम्मद शोएब शेख सलीम उर्फ रफत हा पळून गेला होता. तो शहरात येताच एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या तांबापूरा परिसरातून मुसक्या आवळल्या.
जळगाव शहरातील तांबापूरा परिसरातील खदानीजवळ रईस शेख रशीद रा. मच्छीबाजार व मोहम्मद शोएबशेख सलीम उर्फ रफत रा. बिलाल चौक हे दोघ हातात चॉपर घेवून दहशत माजवितांना दि. २५ डिसंेबर रोजी एमआयडीसी पोलिसांनी रंगेहाथ पकडण्यासाठी गेले. याठिकाणाहून रईस शेख रशिद याला चॉपरसह ताब्यात घेतले होते. तर त्याचा साथीदार मोहम्मद शोएब शेख हा फरार झाला होता.
पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. संशयित हा सोमवार ५ फेब्रुवारी रोजी तांबापूरा परिसरात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. सफौ अतुल वंजारी, पोना सचिन पाटील, किशोर पाटील, ललित नारखेडे यांचे पथकाने पहाटे पाच वाजेच्या सुमारास संशयित मोहम्मद शोएब शेख सलीम उर्फ रफत याला अटक केली. रफत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याविरुद्ध चार गंभीर गुन्हे दाखल आहेत.