चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चैतन्य तांडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निंबा तवर तर उपाध्यक्ष म्हणून दिनकर राठोड यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील चैतन्य तांडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून निंबा नवल तवर व उपाध्यक्षपदी दिनकर मना राठोड यांची आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यावर नवनिर्वाचित सदस्यांची ग्रामपंचायत सरपंच अनिता दिनकर राठोड, उपसरपंच आनंदा राठोड व सदस्य यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान पहिली ते सातवीच्या वर्ग खोल्यांबाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित सदस्यांचे जि.प. शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी सूत्रसंचालन सुनील देवरे यांनी तर आभार बेलदार यांनी मानले.
यावेळी करगाव विकास सोसायटी चेअरमन दिनकर राठोड, उदल पवार, दत्तू पवार, मोतीलाल चव्हाण, समाधान चव्हाण, प्रकाश राठोड, दिलीप राठोड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.