चाळीसगाव: प्रतिनिधी । अनेक दिवसांपासून रखडलेला सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या अभावामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर झालेल्या पैशातून आज चैतन्य तांडा येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन सरपंचाच्या हस्ते सकाळी करण्यात आले.
चैतन्य तांडा गावातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली होती. रस्ता प्रमुख समस्या ग्रामस्थांना भेडसावत होती. मात्र १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर झालेल्या ४ लाख 92 हजार रुपयांतून आज सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन सरपंच अनिता राठोड यांच्या हस्ते करून कामाचे प्रत्यक्षात श्रीगणेशा करण्यात आले. रस्त्यांची समस्या आता मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले
. करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड यांच्या प्रयत्नातून हे साध्य करता आले आहे. सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजनप्रसंगी सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण चव्हाण, वसंत राठोड, राजेंद्र चव्हाण, ज्येष्ठ नागरिक म्हणून मधुकर राठोड व करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड आदी उपस्थित होते.