Home आरोग्य चैतन्य तांडा येथे विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

चैतन्य तांडा येथे विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

0
21

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनातर्फे विराम लॉन्स समोर विना मास्क फिरणाऱ्यांवर  दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान मास्कचे वाटप ग्रामपंचायतीतर्फे  करण्यात आले. 

कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने विराम लॉन्स जवळील बायपासला विना मास्क असणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ग्रामीण पोलीसांच्या मदतीने हि कारवाई करण्यात आली. एकूण २३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रत्येकी शंभर रूपये दंड ठोठावण्यात आला. कारवाई दरम्यान विना मास्क असणाऱ्यांना ग्रामपंचायतीतर्फे मास्कचे वाटप करण्यात आले. या कारवाईत एकूण दोन हजार तीनशे रुपये वसूली ग्रामपंचायतीला  प्राप्त झाले आहे. हि कारवाई चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार युवराज नाईक, हवालदार  बडगुजर, हवालदार   महाजन, दीपक नागरे , उपसरपंच आनंदा राठोड, उदल पवार, विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड आदींनी केली. दरम्यान मास्क वाटपाप्रसंगी सर्वांनी तोंडावर मास्क लावूनच घरा बाहेर पडावे अशी सूचना यावेळी देण्यात आली. कोरोनाला हरवून परत लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी केले.


Protected Content

Play sound