चाळीसगाव: प्रतिनिधी । कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर चैतन्य तांडा ग्रामपंचायतीला लसीचा साठा उपलब्ध झाल्याने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. दहा गरोदर महिलांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली .
कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली असताना तिसऱ्या लाटेचे संकेत तज्ज्ञांकडून देण्यात येत आहेत . त्यामुळे सामान्यांबरोबर गरोदर महिलांचेही जास्तीत जास्त लसीकरण करण्यात यावे यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.
चैतन्य तांडा ग्रामपंचायतीला लसीचा साठा उपलब्ध झाल्याने ग्रामपंचायतीत १० गरोदर व स्तनदा महिलांचे लसीकरण नियमांचे पालन करून करण्यात आले. या शिबिराप्रसंगी लोकनियुक्त सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, ग्रामसेवक कैलास जाधव, सदस्या गीता राठोड, अनिता चव्हाण, प्रवीण चव्हाण, संदीप पवार, वसंत राठोड, डॉ. घनश्याम राठोड, आरोग्य सेवक संदीप पाटील, आरोग्य सेविका ज्योती गांगुर्डे, आशा सेविका कविता जाधव, ज्योती राठोड व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले .