चुंचाळे येथील बंधारा बौद्धवस्तीपासून लांब अंतरावर बांधावा

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे गावातील नदीवर शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा या योजने अंतर्गत लाखो रुपयांच्या निधीतुन बंधाऱ्याचे काम प्रगतीपथावर असुन ,या बांधकामास तात्काळ थांबवून बौद्धवस्तीपासून २ ते ३ किलोमीटर लांब बांधावा अशी मागणी भिमआर्मी या संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या संदर्भात यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश पाटील यांना दिलेल्या तक्रार निवेदनात भिमआर्मी संघटनाने म्हटले आहे की, यावल तालुक्यातील चुंचाळे गावाजवळ परिसरातील नागरीकांना भविष्यात पाण्याची भेडसावणार या दृष्टीकोणातुन भूजल पातळी वाढविण्यासाठी शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा या मोहीमेअंतर्गत चुंचाळे गावातील बौद्ध वस्तीजवळ नदीपात्रात बंधाऱ्याचे काम सद्या प्रगतीपथावर आहे. शासकीय पातळीवर लोकप्रतिनिधीच्या प्रयत्नानी राबविले जाणारे उपक्रम हे कौतुकास्पद आहे. मात्र ज्या ठिकाणी हा बंधारा बांधला जात आहे तिथे नदीला लागुन ३०० मिटरच्या अंतरावर मोठया प्रमाणावर बौद्ध वस्ती आहे. पावसाळ्यात नदीच्या पुराचे पाणी या बांधाऱ्यामुळे उलट्या प्रवाहाच्या आल्यास पावसाळ्यातील पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरेल व यामुळे त्या बौद्ध वस्तीतील गोरगरीब नागरीकांना मोठ्या संकटांना सामोरे जाण्याचे प्रसंग उद्भभवण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता या कामाला तात्काळ थांबवुन नागरीवस्ती पासुन २ ते ३ किलोमिटरच्या लांब बांधावे अशी मागणी भिमआर्मीचे जळगाव जिल्हा सचिव सुपडू संदाशिव यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली आहे.

Protected Content