यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाची दंबगीरी व मनमानी कारभाराच्या विरुद्ध सरपंच व उपसरपंच यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
या संदर्भात चुंचाळे तालुका यावल येथील ग्राम पंचायतच्या सरपंच नौशाद मुबारक तडवी , उपसरपंच मनोज फकीरा धनगर यांच्यासह ग्राम पंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी डॉ मुंजुश्री गामकवाड यांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, आमच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांनी ग्रामपंचायतीत एक सुत्री मनमानी कारभार करीत असुन १५वा वित्त आयोग व ग्रामपंचायतीचे माध्यमातुन होणारी कामे स्वतः करतात. संबधीत ग्रामसेविकेचे पती हे त्यांच्या सोबत राहुन ग्राम पंचायतीच्या कामात हस्तक्षेप करून ग्रामपंचायतीची कामे पतीला करायला लावुन ईतरांच्या नांवावर कामांची बिले काढतात.
या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर या खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात. त्यांनी सरपंच यांची केईवाय स्वतःकडे ठेवली असुन , ग्रामसेविका या त्याचा गैरवापर करून ई टेन्डर करून पतीच्या माध्यमातुन कामे करतात व झालेल्या कामांना मॅनेज करून ग्रामपंचायतीच्या मासीक ग्रामसभेत मंजुरीसाठी ठेवतात. या कामांना ग्रामपंचायत सरपंच आणी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे या पदचा गैरवापर करून केलेल्या कामांच्या खर्चास मंजुर करून घेत असतात. यावेळी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य या संदर्भात जाब विचारण्यास गेल्यास गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात. ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांनी ग्रामपंचायतचे संपुर्ण दफ्तर स्वतःच्या घरी घेवुन गेल्या असुन , त्यांच्या अशा मनमानी व दबंगगीरीच्या एकतर्फी कारभारामुळे चुंचाळे गावातील ग्रामस्थांना आपल्या हक्काच्या मुलभुत सुविधापासुन वंचित राहावे लागत आहे.
या अनुषंगाने ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांची तात्काळ चुंचाळे ग्रामपंचायतीतुन बदली करावी अन्यथा यावल पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा ईशारा सरपंच नौशाद मुबारक तडवी, उपसरपंच मनोज फकिरा धनगर व ग्राम पंचायत सदस्य सपना दिपक कोळी , सरला सुधाकर कोळी , संजय देविरास पाटील यांनी दिला आहे.