यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथे भाजपाचे साकळी दहिगाव गटातील जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य व शिक्षण सभापती रविन्द्र सुर्यभान पाटील (छोटु भाऊ) यांच्या डी.पी.डि.सी. विकास निधी अंतर्गत चुंचाळे येथे अंगणवाडी नुतन खोलीचे भूमिपूजन माजी पिक संरक्षण सोसायटीचे चेअरमन देवचंद कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
सन २०२१-२२ अंतर्गत विद्यार्थ्यांची वाढती संख्या बघता चुंचाळे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात अंगणवाडी नुतनखोलीचे भुमीपुजन गुरुवार दि. ३ मे रोजी माजी पिक संरक्षण सोसायटीचे चेअरमन व भाजपाचे समर्थक देवचंद कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. डी.पी.डी.सी निधी अंतर्गत जवळपास ८ लाख ५० हजार रुपयाचे निधी मंजुर झाले आहेत . यावेळी रविन्द्र पाटील यांनी साकळी दहिगाव गटातील विकास कामे करण्यासाठी मी कटीबंद्ध आहे तसेच अंगणवाडी खोलीचे कामे स्वतः उभे राहून ठेकेदाराकडून चांगल्या प्रतीचे करुन घ्यावे अश्या सुचना प्रत्यक्ष कार्यकर्त्याना व ग्रामपंचायतीला दिल्या. या प्रंसगी चुंचाळे ग्रामपंचायतीचे सदस्य दगडु तडवी, अनिल कोळी, बोराळे ग्रामपंचायतचे उपसरपंच उज्जैंनसिंग राजपुत, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक ईस्माईल तडवी, भटक्या जाती जमातीचे तालुकाध्यंक्ष समाधान धनगर, संजय पाटील, जुम्मा तडवी, चंद्रकांत चौधरी, राजु सोनवणे, नितीन फन्नाटे,किसन महाजन, फत्तु तडवी, ग्रा.प.कर्मचारी मनिष पाटील, दलशेर तडवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. चुंचाळे येथे जि.प.सदस्य रविद्र पाटील यांनी परिसरातील गावांच्या विविध विकास कामांसाठी निधी दिल्याबद्दल चुंचाळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.