यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथे हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतीक म्हणुन ओळखला जाणारा ताजोदीन बाबा आर्थात आरनीवाले बाबा यांच्या स्मरणार्थ भव्य उर्स महोत्सवाचे १ एप्रिल रोजी आयोजन करण्यात येत असते, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र यावर्षी हा उर्स रद्द करण्यात आला आहे.
संपुर्ण देशावर ओढवलेल्या कोरोना विषाणु संक्रमणात वाढ होवू नये यासाठी विविध कार्यक्रम साजरे करण्यावर बंधने आणण्यात आली आहे. यानुसार ताजोद्दीन दर्गावरील उर्स अगदी मर्यादित स्वरूपात कोरोना संसर्गाच्या नियमांचे परिपुर्ण पालन करुन सजरा करण्यात येणार असल्याची माहिती चुंचाळे तालुका यावल येथील हिंदु मुस्लिम एकता समितीच्या वतीने देण्यात आली आहे. पंचक्रोशीतील बाबांच्या शेकडो भाविकांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन ही करण्यात आले आहे.
येथे दिलीप नेवे व संजुसिंग राजपूत यांच्या शेतामध्ये जवळपास नव्वद ते शंभर वर्षेपुर्वीपासुन जागृत देवस्थान ताजोदीन बाबा हे दोघं शेतांच्या बांधावर एक भले मोठे आरणीचे वृक्ष होते. तेथे ते कायम वास्तव्यात असल्यामुळे त्यांना अरणीवाले बाबा असे लोग म्हणत असत. ते बाबा हे सर्वधर्मियांना मार्गदर्शन करत असत. संसार, प्रपंच, शेती या विषयांवर मार्गदर्शन करत. कालांतराने बाबांचा मूत्युनंतर त्यांचे थडगे व दोहे शेतांच्या बांधावर होते. ते आज चुंचाळे येथील माजी सरपंच दगडु तडवी यांनी गावातील तसेच परिसरातील तडवी हिंदू-मुस्लिम बांधवांच्या साह्याने चांगल्या प्रकारच्या दर्ग्याचे बांधकाम केले असून सर्वधमीय भाविकांच्या श्रद्धेपोटी त्या ठिकाणी मानता ठेवत असतात.