नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीन आमच्या भूभागात २० निशस्त्र जवानाच्या हत्येला योग्य कसे काय ठरवत आहे?, याच्यासह काही प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा ट्विट करत मोदी सरकारवर हल्ला चढविला आहे.
राहुल गांधी यांनी चीनने गलवान खोऱ्या आपले सैन्य मागे घेण्याबाबत आणि चीनी पक्षाशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलेल्या चर्चेबाबत तीन प्रश्न विचारले आहेत. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांदरम्यान भारताकडून जैसे थे स्थिती कायम राखण्याच्या मुद्द्यावर जोर का दिला गेला नाही?, चीन आमच्या भूभागात २० निशस्त्र जवानाच्या हत्येला योग्य कसे काय ठरवत आहे? तसेच गलवान खोऱ्यातील आमच्या क्षेत्रीय सार्वभौमत्वाचा उल्लेख का केला गेला नाही? असे तीन प्रश्न विचारून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनी स्टेट काउंसिलर वांग यी यांच्याशी गलवान खोऱ्यातील शांती कायम राखण्याबाबत चर्चा केल्याची माहिती सोमवारी परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी आज प्रश्न उपस्थित करून मोदी सरकारवर हल्ला केला आहे.