रावेर, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका ची बैठक आज चिनावल येथे तालुकाध्यक्ष विलास ताठे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटन ध्येयधोरणे सभासद वाढवणे व संघातर्फे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी तालुका भरातील पत्रकार बंधु मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रावेर तालुक्यातील पत्रकार हा केवळ पत्रकार म्हणूनच कार्य करत नाही तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करत असतो यावेळी पत्रकारावर होणारे अन्याय त्याचप्रमाणे समाजात होणारे अनुचित कार्य यास लगाम घालण्याचे कार्य करतो. त्याअनुषंगाने रावेर तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचे कार्य तसेच शेतकरी, शेतमजूर, नोकरदार या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल यानुसार पत्रकार संघाचे कार्य करावे व समाजात एक आदर्श निर्माण करावा असा यावेळी ठरवण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास ताठे उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, सचिव दिलीप भारंबे, सहसचिव जगदीश चौधरी, तालुका संघटक प्रदीप महाराज पंजाबी तालुका संघटक विनायक संजय जहुरे , सल्लागार सरदार तडवी, सहसल्लागार संतोष बारी,मनिष चव्हाण, अनिल मानकरे , योगेश पाटील ,प्रमोद कोडे , विनोद पाल्हे , सरजू होले , विनोद कोळी , संकेत पाटील , गिरीश नारखेडे ,हसन तडवी ,सुरेश पवार , गणेश भोई ,प्रा.दिलिप सोनवणे , हमीद तडवी हे हजर होते. प्रास्ताविक दिलिप भारंबे यांनी तर तालुका अध्यक्ष विलास ताठे यांनी मार्गदर्शन केले आभार प्रा.दिलिप सोनवणे यांनी मानले.