चीनमध्ये सापडला बर्ड फ्लूच्या नवीन स्ट्रेनचा रुग्ण

 

बीजिंग : वृत्तसंस्था । चीनमध्ये H10N3 हा बर्ड फ्लूचा विषाणू माणसात आढळून आला आहे, मानवात हा विषाणू आढळून येण्याची जगातील ही पहिलीच वेळ आहे.

 

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ही घोषणा केली आहे. झेनजियांग शहरात ४१ वर्षांची एक व्यक्ती बर्ड फ्लूच्या H10N3 या विषाणूने बाधित झाली असून सध्या त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. हा संसर्ग फारसा गंभीर नसल्याचे  सांगण्यात आले चीनचे आजारांशी असलेले संबंध संपण्याचे नाव घेत नाही.

 

महिन्याभरापूर्वी चीनच्या झिनजियांग शहरात एक ४१ वर्षीय नागरीक आजारी पडला आणि रुग्णालयात पोहोचला. त्यानंतर उपचारादरम्यान तो बर्ड फ्लूच्या H10N3 स्ट्रेन ने ग्रस्त असल्याचे निदर्शणास आले. त्या रूग्णात तीव्र ताप आणि सर्दीची लक्षणे दिसली जी कोरोना सारखीच आहेत. या व्यक्तीस बर्ड फ्लू कसा झाला हे समजलेले नाही.

 

H10N3 हा एक नवीन स्ट्रेन आहे, जो गंभीर नसला तरी खबरदारी घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत हा स्ट्रेन बघितल्या गेला नाही,  कोरोनाबद्दल आधीच संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या चीनने या फ्लूच्या पुष्टीकरणानंतर स्वताला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. तेथील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की हा रोग पसरण्याचा धोका कमी आहे.

 

अमेरीका हेल्थ एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) यांनी थेट म्हटले आहे की, “असे रोग फक्त पक्ष्यांपर्यंत मर्यादित आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, हा स्ट्रेन मानवावर किती संसर्गजन्य किंवा प्राणघातक असू शकते हे सध्या माहित नाही. आता बर्ड फ्लूच्या या नव्या स्ट्रेनबद्दल परदेशी संस्था जागरूक झाल्या आहेत. हा रोग कोरोना ऐवढा धोकादायक सिद्ध होऊ नये म्हणून या स्ट्रेनबाबत समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.”

 

बर्ड फ्लूचे अनेक प्रकार आहेत. मात्र याबाबत अद्यापपर्यंत संपूर्ण माहिती प्राप्त झालेली नाही. परंतु मानवांपर्यंत पोहोचणार्‍या काही प्रकारच्या स्ट्रेनची पुष्टी केली गेली आहे. यामध्ये H7N3, H7N7, H7H9, H9N2 आणि H5N1 हे  ५ व्हायरस आहेत. आतापर्यंत H5N1 हा सर्वात धोकादायक व्हायरस मानला जातो. प्रत्येक वेळी या विषाणूचा स्ट्रेन बदलत राहतो जेणेकरून तो स्वत: ला जिवंत ठेवू शकेल. काही मोजकेच मानवांमध्ये संसर्ग पसरवू शकतात. बर्ड फ्लूला वैज्ञानिकदृष्ट्या एव्हीयन इन्फ्लूएन्झा देखील म्हणतात, हा प्रकार A व्हायरसमुळे होतो. हा विषाणू जंगलात पसरतो, परंतु ते पोल्ट्री आणि पक्ष्यांना देखील प्रभावित करतो.

 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या मते, एव्हीयन इन्फ्लूएन्झाची पहिली घटना १९९७ मध्ये समोर आली होती. संसर्ग झालेल्या सुमारे ६० टक्के लोकांनी आपला जीव गमावला. यामध्ये सर्दी, श्वास घेण्यास अडथळा, उलट्या होणे, गळ्यात सुज येणे, असे लक्षणे असतात.

 

Protected Content