चीनमधील शांडोंग येथे बैरूतप्रमाणे शक्तिशाली स्फोट !

बिजिंग (वृत्तसंस्था) बैरूतमधील स्फोटाप्रमाणेच चीनमध्येही मोठ्या प्रमाणत स्फोट झाला आहे. या स्फोटाची भीषणता एवढी होती की कित्येक किलोमीटपर्यंत घराच्या काचा फुटल्या, परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते.

 

 

आतापर्यंत या स्फोटात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्वरित बचावकार्याला सुरूवात करण्यात आली आहे. या स्फोटात जखमी झालेल्यांनाही त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात शेतकरी ज्या ठिकाणी आपलं सामान ठेवतात त्या ठिकाणी हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. लाकडे कापताना वीजेच्या तारांचे नुकसान झाले आणि या ठिकाणी आग लागली आणि स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरातील घरांचे छप्पर उडून गेले. मोठ्या प्रमाणात काचा फुटल्या आणि घर, दुकानांचे नुकसान झाले आहे. तर काही दिवसांपूर्वी लेबनॉनची राजधानी बैरूत येथेही मोठा स्फोट झाला होता. यामध्ये १७८ जणांचा मृत्यू झाला होता.

 

 

 

Protected Content