वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । चीन आधीच अमेरिकेच कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली होती. अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन’च्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. यामुळे अमेरिका-चीनमधील वादाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग डिसेंबर २०१९ मध्ये फैलावण्यास सुरुवात झाली होती. त्याआधीच्या काही आठवडे आधीच चीनमध्ये कोरोना आढळला होता आणि त्यानंतर आरोग्य विभागाला पहिला बाधित आढळला होता. संशोधकांना संसर्गाबाबत काही कल्पना येण्याआधीच विषाणूचा फैलाव जगभरात होत असल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे. अमेरिकेच्या रेड क्रॉससाठी ७३८९ जणांचे रक्ताचे नमुने घेतले होते. त्यापैकी १०६ जणांच्या रक्तात संसर्ग आढळला. क्लिनिकल इन्फेक्शियस डिजीजेसमध्ये हे अभ्यास संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.
रक्ताचे नमुने १३ डिसेंबर ते १७ जानेवारी दरम्यान घेण्यात आले होते. त्यानंतर या रक्तांमध्ये विषाणूंशी दोन हात करणाऱ्या अॅण्टीबॉडीज आहेत का, याची चाचणी करण्यात आली. SARS-CoV-2चा संसर्ग अमेरिकेत डिसेंबर २०१९ पासून असण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर सातत्याने टीका केली होती. चीनमुळेच जगभरात करोनाचा फैलाव झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. चीनमधील हुबेई प्रातांची राजधानी वुहानमधून फैलाव झाला असल्याचे म्हटले जाते. चीनमध्ये थैमान सुरू झाल्यानंतर जगभरात कोरोना फैलावला. चीनने संसर्गाची माहिती लपवल्याचा आरोप अमेरिकेसह काही देशांनी केला होता.चीनने हे आरोप फेटाळून लावले.