जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बसस्थानकाजवळील चिमुकले राम मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
दरवर्षी या जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन चिमुकले राम मंदिर येथे करण्यात येत असते. कोरोनाच्या काळामुळे हा उत्सव अगदी साधेपणाने मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. मात्र यंदा कोरोनाचे निरबन्ध कमी झाल्याने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमी साठी मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी श्रीकृष्णावर भजनेही झाली. भजनांमध्ये भाविक दंग झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. यावेळीं श्रीकृष्णच्या दर्शनासाठी भाविकांनी चिमुकले राम मंदिर येथे मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.