अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सहा वर्षाच्या चिमुकलीवर घरातून बाहेर घेऊन नाल्यात हात बांधून अत्याचार करणाऱ्या नराधमाला अमळनेर न्यायालयाने ७ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील एका गावात ६ वर्षीय चिमुकली ही आई वडील व आजी सोबत वास्तव्याला आहे. आई-वडील हे शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १० जानेवारी २०२२ रोजी चिमुकलीचे आई-वडील हे शेतात काम करण्यासाठी गेले असताना दुपारी १ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी बाबुला बारकू भिल (वय-२८) याने चिमुकलेला बोरं खाण्याचे आम्हीच दाखवत तिला घराजवळील नालाचे पुढे नेत तिचे हात बांधून तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला. हा प्रकार गावातील एका व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हा प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला. या संदर्भात ११ जानेवारी रोजी चोपडा शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी बाबुला बारकू भिल (वय-२८) याच्या विरोधात कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ८ दिवसानंतर संस्थेत आरोपीला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा खटला अमळनेर न्यायालयाचे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.आर. चौधरी यांच्या न्यायालयात चालवण्यात आला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. किशोर बागुल यांनी काम पाहिले. यात खटल्यात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडीतेची आई व पिडीत या इतर जणांची साक्ष महत्त्वाची ठरली. पुराव्यांती न्यायालयाने संशयित आरोपी बाबुला बारकु भिल याला दोषी ठरवत. त्याला ७ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या कामी पैरवी अधिकारी हरीश चौधरी, पोलीस कर्मचारी नितीन कापडणे यांनी सहकार्य केले.